मुंबई

जिल्हा रुग्णालय प्रशासनाची झाडाझडती 

सकाळ वृत्तसेवा

अलिबाग : कोणतीही लहानशी चूक गंभीर स्वरूप धारण करू शकते, अशा शब्दांत आरोग्य उपसंचालिका डॉ. गौरी राठोड यांनी बुधवारी (ता. 8) अलिबाग येथील जिल्हा रुग्णालय प्रशासनाची झाडाझडती घेतली. या वेळी त्यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना सावधानता बाळगण्याच्या सक्त सूचना केल्या. 

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येत असताना आरोग्य यंत्रणेच्या चुकीच्या नियोजनामुळे रुग्णालयात येणारे नागरिक आणि उपचार करणाऱ्या कर्मचाऱ्यांना संसर्ग होण्याच्या घटना घडत आहेत. यासाठी सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांनी सूचनांचे पालन करणे आवश्‍यक आहे.

धक्कादायक : ईएमआयचा ओटीपी सांगाल तर फसाल 

पनवेल, खारघर वगळता रायगड जिल्ह्यात कोरोना साथीने अद्याप शिरकाव केलेला नाही. याचा अर्थ उर्वरित भागात ही साथ पसरणार नसल्याचे समजून आरोग्य यंत्रणेने बेसावध राहू नये, असे राठोड यांनी सांगितले. जिल्हा रुग्णालयात येणारे नियमित रुग्ण आणि संशयित रुग्णांची वेगवेगळ्या विभागांत तपासणी करणे आवश्‍यक आहे. यासाठी आपोडीमध्ये रुग्णांची नियमित तपासणी करणाऱ्या डॉक्‍टरांनीही सावधानता बाळगणे आवश्‍यक असल्याच्या सूचना त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद गवई यांना दिल्या. 
...... 
अपघात विभागात नियमांचे उल्लंघन 
जिल्हा रुग्णालयातील आरोग्य व्यवस्थेची डॉ. गौरी राठोड यांनी पहाणी केली. आणीबाणीच्या वेळेला पुरेशा औषधसाठा, कर्मचारी यांचाही लेखाजोखा घेतला. राठोड यांनी अचानक दिलेल्या भेटीमुळे जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली. अपघात विभागात साथरोग प्रतिबंध नियमांचे उल्लंघन होत असल्याचे पाहून त्या संतापल्या. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT Live Score: बेंगळुरूचे गोलंदाज चमकले! चिन्नास्वामी स्टेडियमवर गुजरातला 147 धावांवरच केलं ऑलआऊट

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

Weather Update : पुण्यात उन्हाचा चटका कायम राहणार; राज्यात वादळी पावसाला पोषक वातावरण

Lok Sabha Election 2024 : ४०० पार घोषणा, पण भाजप अडीचशे जागांवर अडकणार

Latest Marathi News Live Update: नारायण राणेंकडे प्रश्न सोडवण्याची हातोटी- राज ठाकरे

SCROLL FOR NEXT